Friday, February 7, 2025

वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ

 

*वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ 2024 -25*

🥇🥇🥇🥇🥇🥇

 *माध्यमिक विद्यालय चाफोडी या विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ 8/2/2025 रोजी पार पडला.*

 या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवी लक्ष्मी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.व्ही.आर.पाटील सर हे होते.तसेच उपाध्यक्ष मा.आर.एस.झेंडे सर, सचिव मा. श्री.एस.पी सुतार सर,खजानिस मा.एस.व्ही. मुदगल सर हे प्रमुख उपस्थित होते.  सरस्वतीचे पूजन व रोपास पाणी घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. मुख्याध्यापक मा.एस.बी.कानडे सर यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक यांनी केले. त्यानंतर दि प्राथमिक शिक्षक बँक लि. कोल्हापूर या बँकेच्या उपाध्यक्षपदी पुनश्च निवड झाल्याबद्दल संस्थेचे उपाध्यक्ष मा.आर.एस.झेंडे सर यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. तसेच डॉक्टर होमी भाभा बालवैज्ञानिक कॉम्पिटिशनमध्ये व  विज्ञान प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये जिल्हास्तरीय निवड झाल्याबद्दल यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.तसेच ट्रॉफी, प्रमाणपत्र देवून पारितोषिक वितरणाने यशस्वी विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.आभाराने कार्यक्रमाची सांगता  करण्यात आली.


No comments:

Post a Comment