*शालेय निवडणूक एक प्रेरणा*
✌️✌️✌️✌️✌️✌️✌️
*देवी लक्ष्मी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित माध्यमिक विद्यालय, चाफोडी विद्यालयात शुक्रवार दि.17/07/2026 रोजी शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक मोठ्या उत्साहात पार पडली. ही निवडणूक विद्यार्थ्यांना लोकशाही व्यवस्थेची तत्त्वे आणि मतदान प्रक्रियेचे महत्त्व समजावून देणारा एक प्रभावी शैक्षणिक उपक्रम ठरला. या निवडणुकीच्या माध्यमातून उमेदवारी अर्ज भरणे, प्रचार करणे, मतदान करणे, मतमोजणी करणे आणि निकाल जाहीर करणे या सर्व टप्प्यांचा विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभव घेतला. योग्य उमेदवाराची निवड, निपक्ष भूमिका, लोकशाही मूल्यांचा स्वीकार आणि नेतृत्वगुणांचा विकास यांसाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरला.विजयी उमेदवारांचे अभिनंदन करताना मुख्याध्यापक मा.एस बी कानडे सर यांनी विद्यार्थ्यांमध्ये प्रामाणिकपणा, शिस्त, सहकार्य, निर्णयक्षमता आणि सामाजिक उत्तरदायित्व यांसारख्या गुणांची जोपासना करणे. भविष्यात सुजाण आणि जबाबदार नागरिक घडविण्यासाठी शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे प्रतिपादन केले.विद्यार्थ्यांनी विजयोत्सव एकत्र साजरा करून एक वेगळा आदर्श निर्माण केला*
🚩🚩🟣🔵🎊🎊✌️✌️