स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
देवी लक्ष्मी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित माध्यमिक विद्यालय चाफोडी
ता. करवीर विद्यालयात देशाचा 80 वा 'स्वातंत्र्य दिन' मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ध्वजारोहण
चाफोडी ग्रामपंचायतच्या सरपंच सौ. सुरेखा सर्जेराव काशीद यांच्या हस्ते करण्यात
आले.
या कार्यक्रमासाठी ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, गावातील सर्व संस्थांचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक,
शिक्षकेतर कर्मचारी,सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी व ग्रामस्थ, आजी-माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गावातून प्रभात फेरी काढून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

