Sunday, June 21, 2026

आंतरराष्ट्रीय योग दिन

  आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

  माध्यमिक विद्यालय चाफोडी विद्यालयात 21जून 2026 रोजी 'योग दिन' मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. श्री.व्ही.एम.पात्रे सर यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

 श्री.आर.एल.चौगले सर यांनी योगाचे शारीरिक व मानसिक फायदे याबद्दल माहिती दिली. मुख्याध्यापक मा. एस.बी.कानडे सर यांनी 'जीवनात योगाचे महत्व' या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करताना योग करण्याची गरज, त्याचे फायदे, जगामध्ये योगाला आलेले महत्त्व, भारताची संस्कृती आणि परंपरा. याबद्दल सखोल माहिती देऊन योग सतत करण्याची आवश्यकता असल्याचे विशद केले . 

 त्यानंतर योग शिक्षक म्हणून श्री.ईश्वर भोसले यांनी सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींना योगासाठी सिद्ध करून, योगाचे महत्त्व सांगत विविध प्रकारची आसने, प्राणायाम, कपालभारती अशा विविध माध्यमातून विद्यार्थ्यांच्याकडून प्रात्यक्षिकासह करून घेतली,त्यानंतर काही विद्यार्थी विद्यार्थिनींनी यावेळी आपल्याला अवगत असलेल्या विविध प्रकारच्या आसनांचे सादरीकरण करून सर्वांच्या टाळ्या मिळवल्या.

 श्री.व्ही.के.पोतदार सर यांनी मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. 

Monday, June 15, 2026

गुणवंतांचा सत्कार समारंभ

गुणवंतांचा सत्कार समारंभ

  देवी लक्ष्मी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित माध्यमिक विद्यालय चाफोडी ता.करवीर या विद्यालयात शैक्षणिक वर्ष 2025-26 या वर्षांमध्ये एस.एस.सी.बोर्ड परीक्षेत उत्कृष्ट गुण संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ पार पडला.यावेळी प्रथम 1)अनुष्का पाटील(98.00%)
2)सिद्धी सुर्वे (93.20)
3)ऋतिका काशीद (91.60)
4)वर्षा पाटील (91.20)
5)स्नेहल सुर्वे (90.80)
6)किशोरी सुतार(90.80)
 विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प,ट्रॉफी व वही तसेच सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प व वही देऊन सत्कार करण्यात आला* 
तसेच इ 8 वी NMMS परीक्षेत पात्र आणि शिष्यवृत्ती उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
*यावेळी संस्थेचे अध्यक्ष मा.व्ही आर पाटील सर जि.प.सदस्य मा.राजेंद्र सूर्यवंशी(पिंटू भाऊ) मा.क्रांतीसिंह पवार-पाटील(दादा),संस्थेचे सचिव मा.एस पी सुतार सर सदस्य भैरु कुपले सर,सरपंच सौ सुरेखा काशीद, मुख्याध्यापक मा.एस बी कानडे सर पो.पाटील मा.भगवान पाटील,माजी सरपंच साताप्पा सुर्वे,देवस्थाचे अध्यक्ष मा.बळीराम पाटील, प्रगतशील शेतकरी मा.कुंडलिक पाटील,मा.संभाजी पाटील,सर्जेराव काशीद उपस्थित होते.

नवागतांचा प्रवेशोत्सव

नवागतांचा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा

  देवी लक्ष्मी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित माध्यमिक विद्यालय चाफोडी ता.करवीर या विद्यालयात नवीन शैक्षणिक वर्ष 2026-27 या शैक्षणिक वर्षांमध्ये विद्यालयात प्रवेश घेतलेल्या इ 8 वीच्या सर्व विद्यार्थ्यांचा व 9,10वी मध्ये नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव व स्वागत समारंभ मोठ्या दिमाखात पार पडला.*  
*यावेळी नवागत विद्यार्थ्यांचे वाद्याच्या तालात,पुष्पवृष्टी करत,मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यालयात आगमन करण्यात आले,तसेच गुलाबपुष्प,वही,पाठ्यपुस्तक वितरण करण्यात आले. नशामुक्त भारत शपथ घेऊन गोड शिरा वाटप केले*
*यावेळी संस्थेचे अध्यक्ष मा.व्ही आर पाटील सर जि.प.सदस्य मा.राजेंद्र सूर्यवंशी(पिंटू भाऊ) व मा.क्रांतीसिंह पवार-पाटील(दादा),संस्थेचे सचिव मा.एस पी सुतार सर सदस्य भैरु कुपले सर,सरपंच सौ सुरेखा काशीद, मुख्याध्यापक मा.एस बी कानडे सर पो.पाटील मा.भगवान पाटील,माजी सरपंच साताप्पा सुर्वे,देवस्थान कमिटीचे अध्यक्ष मा.बळीराम पाटील, प्रगतशील शेतकरी मा.कुंडलिक पाटील,मा.संभाजी पाटील,सर्जेराव काशीद,सर्व शिक्षक स्टाफ,पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.*