Sunday, June 21, 2026

आंतरराष्ट्रीय योग दिन

  आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

  माध्यमिक विद्यालय चाफोडी विद्यालयात 21जून 2026 रोजी 'योग दिन' मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. श्री.व्ही.एम.पात्रे सर यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

 श्री.आर.एल.चौगले सर यांनी योगाचे शारीरिक व मानसिक फायदे याबद्दल माहिती दिली. मुख्याध्यापक मा. एस.बी.कानडे सर यांनी 'जीवनात योगाचे महत्व' या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करताना योग करण्याची गरज, त्याचे फायदे, जगामध्ये योगाला आलेले महत्त्व, भारताची संस्कृती आणि परंपरा. याबद्दल सखोल माहिती देऊन योग सतत करण्याची आवश्यकता असल्याचे विशद केले . 

 त्यानंतर योग शिक्षक म्हणून श्री.ईश्वर भोसले यांनी सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींना योगासाठी सिद्ध करून, योगाचे महत्त्व सांगत विविध प्रकारची आसने, प्राणायाम, कपालभारती अशा विविध माध्यमातून विद्यार्थ्यांच्याकडून प्रात्यक्षिकासह करून घेतली,त्यानंतर काही विद्यार्थी विद्यार्थिनींनी यावेळी आपल्याला अवगत असलेल्या विविध प्रकारच्या आसनांचे सादरीकरण करून सर्वांच्या टाळ्या मिळवल्या.

 श्री.व्ही.के.पोतदार सर यांनी मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. 

No comments:

Post a Comment