Tuesday, September 8, 2026
Saturday, August 15, 2026
स्वातंत्र्य दिन
स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
देवी लक्ष्मी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित माध्यमिक विद्यालय चाफोडी
ता. करवीर विद्यालयात देशाचा 80 वा 'स्वातंत्र्य दिन' मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ध्वजारोहण
चाफोडी ग्रामपंचायतच्या सरपंच सौ. सुरेखा सर्जेराव काशीद यांच्या हस्ते करण्यात
आले.
या कार्यक्रमासाठी ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, गावातील सर्व संस्थांचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक,
शिक्षकेतर कर्मचारी,सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी व ग्रामस्थ, आजी-माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गावातून प्रभात फेरी काढून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
Saturday, August 8, 2026
Wednesday, July 29, 2026
गुरुपौर्णिमा
गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी
देवी लक्ष्मी शिक्षण प्रसारक मंडळ, संचलित माध्यमिक विद्यालय चाफोडी विद्यालयात दि. 29/7/2026 रोजी व्यासमुनी जन्मदिन गुरुपौर्णिमा मोठया
उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. मुख्याध्यापक एस.बी.कानडे सर हे
होते. प्रथम सरस्वती पूजनाने कार्यक्रमाचे सुरुवात करण्यात आली
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्ही एम. पात्रे सर यांनी केले
कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी
गुरुंचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. तसेच गुरुवंदना गीत गायिले
विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारी
मनोगते व्यक्त केली.तसेच अध्यापकांनी विद्यार्थ्यांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा
दिल्या.
अध्यक्षीय भाषणात मा.एस बी कानडे सर यांनी 'गुरुपौर्णिमेचे महत्त्व' उपस्थितांना
विशद केले.
या कार्यक्रमानिमित्त विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना इयत्ता
दहावीच्या विद्यार्थ्याकडून जेवण देण्यात आले. कार्यक्रमाचे
सूत्रसंचालन इयत्ता दहावीच्या वर्षा रोटे व अपूर्वा पोवार यांनी केले व आभार आदिती
बेरकळ यांनी मानले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
Thursday, July 16, 2026
शालेय मंत्रिमंडळ निवडणूक 2026
Sunday, June 21, 2026
आंतरराष्ट्रीय योग दिन
माध्यमिक विद्यालय चाफोडी विद्यालयात
21जून 2026 रोजी 'योग दिन' मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. श्री.व्ही.एम.पात्रे सर यांनी
उपस्थितांचे स्वागत केले.
श्री.आर.एल.चौगले सर यांनी योगाचे शारीरिक व मानसिक फायदे याबद्दल
माहिती दिली. मुख्याध्यापक मा. एस.बी.कानडे सर यांनी 'जीवनात योगाचे महत्व' या
विषयावर सविस्तर मार्गदर्शन करताना योग करण्याची गरज, त्याचे फायदे, जगामध्ये
योगाला आलेले महत्त्व, भारताची संस्कृती आणि परंपरा.
याबद्दल सखोल माहिती देऊन योग सतत करण्याची आवश्यकता असल्याचे विशद केले .
त्यानंतर योग शिक्षक म्हणून श्री.ईश्वर भोसले यांनी सर्व
विद्यार्थी-विद्यार्थिनींना योगासाठी सिद्ध करून, योगाचे महत्त्व सांगत विविध प्रकारची आसने, प्राणायाम, कपालभारती अशा विविध माध्यमातून
विद्यार्थ्यांच्याकडून प्रात्यक्षिकासह करून घेतली,त्यानंतर काही विद्यार्थी विद्यार्थिनींनी यावेळी आपल्याला अवगत
असलेल्या विविध प्रकारच्या आसनांचे सादरीकरण करून सर्वांच्या टाळ्या मिळवल्या.
श्री.व्ही.के.पोतदार सर यांनी मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रमाची
सांगता करण्यात आली.
आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

Monday, June 15, 2026
गुणवंतांचा सत्कार समारंभ
नवागतांचा प्रवेशोत्सव
Tuesday, May 19, 2026
एसएससी निकाल 2026
*V* ©️✦✿•┈•Wednesday, February 11, 2026
Sunday, January 4, 2026
सावित्रीबाई फुले जन्मदिन
सावित्रीबाई फुले जन्मदिन
🎊🎊🎊🎊🎊🎊🎊
माध्यमिक विद्यालय, चाफोडी ता.करवीर विद्यालयात 'बालिका दिन', 'क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले' यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.एस.बी.कानडे सर,सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी.
🌹🌹🌹🙏🙏🌹🌹🌹