Thursday, July 16, 2026

शालेय मंत्रिमंडळ निवडणूक 2026


*शालेय निवडणूक एक प्रेरणा*
✌️✌️✌️✌️✌️✌️✌️
*देवी लक्ष्मी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित माध्यमिक विद्यालय, चाफोडी विद्यालयात शुक्रवार दि.17/07/2026 रोजी शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक मोठ्या उत्साहात पार पडली. ही निवडणूक विद्यार्थ्यांना लोकशाही व्यवस्थेची तत्त्वे आणि मतदान प्रक्रियेचे महत्त्व समजावून देणारा एक प्रभावी शैक्षणिक उपक्रम ठरला. या निवडणुकीच्या माध्यमातून उमेदवारी अर्ज भरणे, प्रचार करणे, मतदान करणे, मतमोजणी करणे आणि निकाल जाहीर करणे या सर्व टप्प्यांचा विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभव घेतला.  योग्य उमेदवाराची निवड, निपक्ष भूमिका, लोकशाही मूल्यांचा स्वीकार आणि नेतृत्वगुणांचा विकास यांसाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरला.विजयी उमेदवारांचे अभिनंदन करताना मुख्याध्यापक मा.एस बी कानडे सर यांनी विद्यार्थ्यांमध्ये प्रामाणिकपणा, शिस्त, सहकार्य, निर्णयक्षमता आणि सामाजिक उत्तरदायित्व यांसारख्या गुणांची जोपासना करणे. भविष्यात सुजाण आणि जबाबदार नागरिक घडविण्यासाठी शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे प्रतिपादन केले.विद्यार्थ्यांनी विजयोत्सव एकत्र साजरा करून  एक वेगळा आदर्श निर्माण केला*
🚩🚩🟣🔵🎊🎊✌️✌️

Wednesday, February 11, 2026

वनभोजन 2025

दि.10.02.2026
ठिकाण: सातेरी मंदिर, बेरकळवाडी 

Sunday, January 4, 2026

सावित्रीबाई फुले जन्मदिन

 


सावित्रीबाई फुले जन्मदिन

🎊🎊🎊🎊🎊🎊🎊

माध्यमिक विद्यालय, चाफोडी ता.करवीर विद्यालयात 'बालिका दिन',  'क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले' यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.एस.बी.कानडे सर,सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी.

🌹🌹🌹🙏🙏🌹🌹🌹

Monday, December 22, 2025

मा एस.बी.कानडे सर यांची कौन्सिल सदस्यपदी' निवड

 

अभिनंदन!! अभिनंदन!!

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

 देवी लक्ष्मी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित,माध्यमिक विद्यालय, चाफोडी विद्यालयाचे ,शिक्षणक्षेत्रात उल्लेखनीय व भरीव योगदान देणारे, शिस्तप्रिय, संयमी,कर्तव्यनिष्ठ व दूरदृष्टी व्यक्तिमत्त्व असलेले 'आदर्श मुख्याध्यापक' पुरस्कार प्राप्त  मुख्याध्यापक मा एस.बी.कानडे सर यांची महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा  मुख्याध्यापक संघ महामंडळ मुंबई या संस्थेच्या 'कौन्सिल सदस्यपदी' निवड झाली. त्याबद्दल विद्यालयाच्या वतीने त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.

कानडे सर यांनी आपल्या कार्यकाळात गुणवत्ता, नवोपक्रम, विद्यार्थीहित आणि शिक्षक सक्षमीकरण यांना प्राधान्य देत विद्यालयाचा सर्वांगीण विकास साधला आहे. त्यांच्या कार्यक्षम नेतृत्वाखाली शाळेने विविध शैक्षणिक, सांस्कृतिक व स्पर्धात्मक क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यांची प्रगल्भ विचारसरणी, निर्णयक्षमता,कामातील पारदर्शकता,संवेदनशीलता आणि समाजभिमुख कार्यशैली यामुळे कौन्सिलच्या कामकाजाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त करून त्यांच्या पुढील  कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.

🌹🌹🌹🌹🌹

Tuesday, December 9, 2025

श्री.भगवान पाटील संचालकपदी निवड

 


हार्दिक अभिनंदन

🌹🌹🌹🌹🌹🌹

माध्यमिक विद्यालय, चाफोडी ता.करवीर विद्यालयाचे अभ्यासू, कार्यतत्पर लिपिक श्री.भगवान हिंदुराव पाटील यांची करवीर तालुका शिक्षकेतर कर्मचारी संघटना संचालकपदी  निवड झालेबद्दल हार्दिक अभिनंदन

🌹🌹🌹🌹🌹🌹

शुभेच्छुक:

मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी.


माध्यमिक विद्यालय, चाफोडी. ता.करवीर

🌹🌹🌹🌹🌹🌹

Wednesday, November 26, 2025

शालेय वार्षिक तपासणी

 


शालेय वार्षिक तपासणी

♾️♾️♾️♾️♾️♾️♾️


देवी लक्ष्मी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित माध्यमिक विद्यालय चाफोडी या विद्यालयाची शालेय वार्षिक  तपासणी गुरुवार दिनांक 27 11 2025 रोजी संपन्न झाली. जिल्हा परिषद कोल्हापूरचे उपशिक्षणाधिकारी मा. श्री. आर.जी. चौगले साहेब, विस्तार अधिकारी मा. श्री. पी. एस. आंग्रे साहेब यांनी विद्यालयाची तपासणी केली. यावेळी मुख्याध्यापक श्री.बाजीराव साळवी सर, सुधीर आमनगी सर, चरापले सर तपासणी पथकामध्ये सहभागी होते. तपासणीची सुरुवात शालेय परिपाठापासून झाली. कराओकेच्या सहाय्याने राष्ट्रगीत, प्रार्थना, महाराष्ट्रगीत विद्यार्थ्यांनी तालासुरात सादर केले. परिपाठाचे सर्व घटक विद्यार्थ्यांनी प्रभावीपणे सादर केले. यानंतर तज्ज्ञ शिक्षकांच्या उपस्थितीत पाठाचे निरीक्षण झाले. त्यानंतर झालेल्या सभेमध्ये तज्ज्ञ शिक्षकांनी  पाठनिरीक्षणामध्ये निदर्शनास आलेल्या मार्गदर्शकपर सूचना केल्या. मा.आर.जी.चौगले साहेब, मा.पी.एस.आंग्रे.साहेब

यांनी दिवसभराचे कामकाज मूल्यमापन करून शिक्षकांसमोरील आव्हाने, कामकाज, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यावर मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या.

आभारानंतर सभेची 

सांगता करण्यात आली.

🎊🎊🎊🎊🎊🎊🎊