प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
*माध्यमिक विद्यालय, चाफोडी ता.करवीर.विद्यालयात रविवार दि.26 जानेवारी 2025 रोजी आपल्या देशाचा 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे ध्वजारोहण देवी लक्ष्मी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा.व्ही.आर .पाटील सर यांचे हस्ते करण्यात आले.तसेच चाफोडी गावचे विद्यमान सरपंच मा.साताप्पा सुर्वे यांचे हस्ते श्रीफळ वाढवून,उपस्थित महिला भगिनींनीच्या हस्ते ध्वजपूजन करण्यात आले*
*त्यानंतर गावातून घोषणा देत प्रभातफेरी काढण्यात आली.*
*या कार्यक्रमासाठीसंस्थेचे अध्यक्ष मा.व्ही. आर.पाटील सर, विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.एस बी.कानडे सर सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,चाफोडी गावाचे सरपंच,उपसरपंच,सर्व सदस्य,पोलीस पाटील सर्व संस्थांचे पदाधिकारी, माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी,तसेच गावातील तरुण मोठया संख्येने उपस्थित होते*
*कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.व्ही.एम.पात्रे सर यांनी केले शेवटी आभाराने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली*.
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
No comments:
Post a Comment