Wednesday, November 12, 2025

शालेय क्रीडा स्पर्धा

 


शालेय क्रीडा स्पर्धा उत्साहात सुरू

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

देवी लक्ष्मी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित माध्यमिक विद्यालय चाफोडी ता .करवीर, जि.कोल्हापूर या विद्यालयाच्या शालेय क्रीडा स्पर्धांची सुरुवात गुरुवार दि.13/11/2025 रोजी उत्साहात झाली. कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभासाठी संस्थेचे अध्यक्ष मा.व्ही.आर. पाटील सर, सचिव मा. एस. पी. सुतार सर, मुख्याध्यापक मा. एस.बी. कानडे सर, प्रतिष्ठित नागरिक मा.नारायण काशीद, दत्तात्रय सावंत, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थीनी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या स्वागतानंतर कार्यक्रमाचे प्रस्तावित मुख्याध्यापक मा. एस. बी कानडे सर यांनी केले. यानंतर मा.व्ही.आर.पाटील सर यांचे हस्ते क्रीडा मशाल प्रज्वलित करून क्रीडांगणाचे उद्घाटन मा.एस.पी. सुतार सर यांच्या हस्ते संपन्न झाले. 

मान्यवरांनी आपल्या मनोगतातून  खेळाचे जीवनातील महत्त्व सांगून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. आभारानंतर सांघिक खो खो गटाचा एक प्रदर्शनीय सामना घेण्यात आला.इतर प्रेक्षक विद्यार्थ्यांनी खेळाडूंना भरभरून, टाळ्यांच्या गजरात दाद दिली.  स्पर्धेत सांघिक व वैयक्तिक खेळांचा समावेश करण्यात आला आहे.

🏆🥉🥈🥇🌹🌹

No comments:

Post a Comment