. 🚌🚌🚌🚌🚌🚌
*शैक्षणिक सहल*
*✤┈┈••✦✦••┈┈✤*
देवी लक्ष्मी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित
*माध्यमिक विद्यालय चाफोडी, ता.करवीर* विद्यालयाची शैक्षणिक सहल 26 व 27/12/2024 रोजी दोन दिवस एक मुक्कामी आयोजित केली होती.
पहिल्या दिवशी नारायणपूर येथे बालाजी दर्शन करून कात्रज येथील राजीव गांधी प्राणीसंग्रहालयास भेट दिली. त्यानंतर देहू, प्रतीशिर्डी येथील दर्शन करून आळंदी येथे मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी लेण्याद्री व ओझर येथील गणपती दर्शन करून शिवनेरी किल्ला विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या जयघोषात लिलया पार केला.
सहलीमध्ये 80 विद्यार्थी-विद्यार्थिनी उत्साहाने सहभागी झाले होते. यासाठी मुख्याध्यापक श्री.एस.बी.कानडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक - शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले तर संस्था अध्यक्ष श्री.व्ही.आर.पाटील सर, उपाध्यक्ष श्री.आर.एस.झेंडे सर, सचिव श्री.एस.पी.सुतार सर, खजानिस श्री.एस.व्ही.मुदगल सर यांचे प्रोत्साहन मिळाले.
•┈•✿✦Ⓜ️ *V* ©️✦✿•┈•
No comments:
Post a Comment