अभिनंदन!! अभिनंदन!!
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
देवी लक्ष्मी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित,माध्यमिक विद्यालय, चाफोडी विद्यालयाचे ,शिक्षणक्षेत्रात उल्लेखनीय व भरीव योगदान देणारे, शिस्तप्रिय, संयमी,कर्तव्यनिष्ठ व दूरदृष्टी व्यक्तिमत्त्व असलेले 'आदर्श मुख्याध्यापक' पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक मा एस.बी.कानडे सर यांची महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ मुंबई या संस्थेच्या 'कौन्सिल सदस्यपदी' निवड झाली. त्याबद्दल विद्यालयाच्या वतीने त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
कानडे सर यांनी आपल्या कार्यकाळात गुणवत्ता, नवोपक्रम, विद्यार्थीहित आणि शिक्षक सक्षमीकरण यांना प्राधान्य देत विद्यालयाचा सर्वांगीण विकास साधला आहे. त्यांच्या कार्यक्षम नेतृत्वाखाली शाळेने विविध शैक्षणिक, सांस्कृतिक व स्पर्धात्मक क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यांची प्रगल्भ विचारसरणी, निर्णयक्षमता,कामातील पारदर्शकता,संवेदनशीलता आणि समाजभिमुख कार्यशैली यामुळे कौन्सिलच्या कामकाजाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त करून त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.
🌹🌹🌹🌹🌹






















