माध्यमिक विद्यालय चाफोडी ता. करवीर, जि. कोल्हापूर विद्यालयात उन्हाळी संस्कार शिबिर आयोजित करण्यात आले होते. कॅम्पचे उद्घाटन मुख्याध्यापक मा. श्री. एस. बी. कानडे सर यांच्या हस्ते करण्यात आले. या संस्कार शिबिरामध्ये पारंपारिक, हरवत चाललेले खेळ यामध्ये लगोरी, विटी दांडू, सायकल चालवणे तसेच विविध फनी गेम्स यांचे आयोजन करण्यात आले होते. मुलांचे मनोरंजन व्हावे,मनोबल वाढावे, आपल्या संस्कृतीची ओळख व्हावी आणि ती आपण जतन करावी यासाठी तसेच मुलांचे शिक्षण आनंददायी व्हावे, उत्साहाने पुढील वाटचाल करावी या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मा मुख्याध्यापक श्री. एस. बी. कानडे सर यांनी या शिबिराबद्दल बहुमोल असे मार्गदर्शन केले.
No comments:
Post a Comment