माध्यमिक विद्यालय चाफोडी ता करवीर येथील माध्यमिक विद्यालयात येत्या लोकसभेच्या धर्तीवर 2024 मध्ये मतदान करण्यात येणार आहे. त्यानिमित्त मतदारांच्या मध्ये जनजागृती व्हावी, लोकांनी आपले बहुमोल मत व्यर्थ न घालवता योग्य प्रतिनिधीची निवड करावी, मतदानाची टक्केवारी वाढावी, 100% मतदान व्हावे या उद्देशाने विद्यालयामार्फत 19 /4/ 2024 रोजी सकाळी 7:30 वाजता गावातून जनजागृती फेरीचे आयोजन करण्यात आले. या फेरीमध्ये विद्यालयातील मुख्याध्यापक श्री. एस. बी. कानडे सर, सर्व शिक्षक स्टाफ, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सहभागी झाले होते. मुलांनी हातामध्ये फलक घेऊन घोषणा देत चाफोडी, गर्जन आणि मांडरे या तीन गावातून जोरजोरात घोषणा देत फेरी काढण्यात आली.विविध घोषणानी व या फेरीने गावातील सर्व लोकांचे लक्ष वेधून घेतले . फेरीनंतर मुख्याध्यापक मा.श्री.एस बी कानडे सर यांनी सर्व मुलांना मतदानाबद्दल मार्गदर्शन करताना घरी पालकांना जागृत करावं, पत्र लेखन,जनजागृती फेरी याच्या माध्यमातून निश्चित मतदानाची टक्केवारी वाढेल अशी अपेक्षा व्यक्त केली. आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
No comments:
Post a Comment