कोजिम प्रेरणा पुरस्कार
माध्यमिक विद्यालय चाफोडी, ता.करवीर, जि.कोल्हापूर विद्यालयातील मराठी विषयाचे तज्ञ अध्यापक श्री. व्ही.एम.पात्रे सर यांना कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघ, कोल्हापूर यांच्या वतीने "कोजिम प्रेरणा पुरस्कार" प्रदान करण्यात आला. याबद्द्ल त्यांचे हार्दीक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा... शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे झालेल्या कार्यक्रमात, शिवाजी विद्यापीठ मराठी विभागप्रमुख डॉ. नंदकुमार मोरे, साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक किरण गुरव तसेच कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघ अध्यक्ष राजेंद्र पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. एस.बी.कानडे सर, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी व कुटुंबीय उपस्थीत होते...
No comments:
Post a Comment