दि.21.06.2018 रोजी विद्यालयामध्ये आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात संपन्न झाला. विद्यालयातील सर्व विद्यार्थी- विद्यार्थिनी, मुख्याध्यापक श्री.एस.बी.कानडे सर, सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी यामध्ये सहभागी झाले.
प्रथम मुख्या.कानडे सरांनी योगाचे आपल्या जीवनातील महत्व विषद केले. क्रीडाशिक्षक श्री.आर.एल.चौगले सर यांनी विविध योगासनांचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. विद्यालयातील काही विद्यार्थी-विद्यार्थिनिंनी यामध्ये उस्फुर्थ सहभाग घेऊन योगाची प्रात्यक्षिके करून दाखविली . विविध योगासने व त्यांचे आपल्या शरीरास होणारे फायदे याविषयी सर्वांना विस्तृत मार्गदर्शन झाले.
योगदिनाचा व्हिडीओ पाहण्यासाठी खालील प्ले बटनावर क्लिक करा.
...क्षणचित्रे...
No comments:
Post a Comment