एक हात मदतीचा...
दि. 01.06.2018 रोजी विद्यालयामध्ये इयत्ता दहावीच्या गरजू विद्यार्थांना मोफत पाठ्यपुस्तके वितरीत करण्यात आली. गावातील दानशूर व्यक्ती व माजी विद्यार्थ्यांमार्फत हे वितरण करण्यात आले. यामध्ये श्री.पांडुरंग पोवार, प्रियांका काशीद, अरविंद पोवार, नवनाथ सुतार, गणेश पाटील, दीपक कांबळे यांनी विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तके प्रदान केली.
इयत्ता दहावीच्या महेश बेरकळ, विजयकुमार पोवार, रोहन पोतदार, अवधूत चव्हाण, शैलेश कांबळे, सानिका कांबळे, पूजा सुतार, मयुरी दळवी, ऋतुजा नाईक, कोमल चव्हाण या दहा विद्यार्थांना ही पाठ्यपुस्तके वितरीत करण्यात आली.
शासनामार्फत इयत्ता आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात. परंतु त्यापुढील शिक्षणासाठी पालकांना पाठ्यपुस्तके विकत घ्यावी लागतात. यासोबत वह्या व इतर शैक्षणिक साहित्य घेताना काही पालकांची दमछाक होते. ही गरज ओळखून शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन मदतीचा हात दिला व अशा विद्यार्थी व पालकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. या त्यांच्या स्तुत्य उपक्रमाबद्दल विद्यालयातर्फे श्री.पांडुरंग पोवार, प्रियांका काशीद, अरविंद पोवार, नवनाथ सुतार,गणेश पाटील, दीपक कांबळे यांचे हार्दिक आभार...
No comments:
Post a Comment