करिअर मार्गदर्शन...
दि.09/06/2018 रोजी विद्यालयामध्ये भारती विद्यापीठ कोल्हापूर येथील इलेक्ट्रोनिक्स डिपार्टमेंटचे प्रमुख असित कित्तूर सर यांचे व्याख्यान आयोजित केले होते. नुकताच दहावीचा निकाल ऑनलाईन घोषित झाला. विद्यालयातील सर्वच विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन विद्यालयाची सलग १००% निकालाची परंपरा नवव्यांदा कायम राखली.
या विद्यार्थांना पुढील करिअरच्या विविध वाटांची ओळख व्हावी या उद्देशाने हे व्याख्यान आयोजित केले होते. कित्तूर सरांनी आपल्या लाघवी भाषेत विद्यार्थ्यांना भविष्यातील विविध टप्प्यांचे मार्गदर्शन केले. विविध बोधकथांच्या माध्यमातून आपण जीवन कसं जगलं पाहिजे याचा मूलमंत्र दिला. आत्मविश्वास बाळगून कठोर परिश्रम केल्यास यश नक्की मिळते असा विश्वास त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
कार्यक्रमास विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.एस.बी.कानडे, सहा.शिक्षक श्री.व्ही.एम.पात्रे, श्री.व्ही.के.पोतदार तसेच डॉ.तानाजी पाटील,अरविंद पोवार व इयत्ता दहावीचे विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.
कित्तूर सरांचे स्वागत करताना मुख्याध्यापक श्री.कानडे सर
No comments:
Post a Comment