Thursday, June 21, 2018

आंतरराष्ट्रीय योगदिन 2018


      दि.21.06.2018 रोजी विद्यालयामध्ये आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात संपन्न झाला. विद्यालयातील सर्व विद्यार्थी- विद्यार्थिनी, मुख्याध्यापक श्री.एस.बी.कानडे सर, सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी यामध्ये सहभागी झाले.
             प्रथम मुख्या.कानडे सरांनी योगाचे आपल्या जीवनातील महत्व विषद केले. क्रीडाशिक्षक श्री.आर.एल.चौगले सर यांनी विविध योगासनांचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन  केले. विद्यालयातील काही विद्यार्थी-विद्यार्थिनिंनी यामध्ये उस्फुर्थ सहभाग घेऊन योगाची प्रात्यक्षिके करून दाखविली . विविध योगासने व त्यांचे आपल्या शरीरास होणारे फायदे याविषयी सर्वांना विस्तृत मार्गदर्शन झाले.

योगदिनाचा व्हिडीओ पाहण्यासाठी खालील प्ले बटनावर क्लिक करा.
...क्षणचित्रे...






  










Tuesday, June 12, 2018

दहावी निकाल मार्च 2018

अभिनंदनीय यश..
          इयत्ता दहावीचा निकाल दि.08/06/2018 रोजी ऑनलाईन घोषित झाला. यामध्ये विद्यालयाचा सलग नवव्यांदा 100% निकाल  लागला. याबद्दल परिसरातून शाळेवर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. 
               दहावीच्या मार्च 2018 परीक्षेस 52 विद्यार्थी प्रविष्ठ झाले  होते. सर्वच विद्यार्थी चागल्या गुणांनी उत्तीर्ण झाले. यामध्ये 27 विद्यार्थ्यांना विशेष प्राविण्य17 विद्यार्थांना प्रथम श्रेणी व  8 विद्यार्थ्यांना द्वितीय श्रेणी मिळाली.
गुणानुक्रम
1. देवयानी विलास पाटील ( 93%)
2. सत्यश्री विलास पाटील ( 92.60%)
3. रोहिणी विकास सुतार (92%)
4. अंजली अर्जुन काशीद ( 91.40%)
5. ऋतिका तानाजी सुर्वे (90.60%)

                       यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक श्री.एस.बी.कानडेसहा.शिक्षक श्री.व्ही.एम्. पात्रे,  श्री.बी.एस.पोवार,   श्री.व्ही.के.पोतदार,   श्री.आर.एल.चौगले आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मार्गदर्शन तसेच  संस्थेचे अध्यक्ष श्री.व्ही.आर.पाटीलउपाध्यक्ष श्री.आर.एस. झेंडेसचिव श्री.एस.पी.सुतार,   खजानिस श्री.एस.व्ही.मुदगल यांचे प्रोत्साहन मिळाले.

Saturday, June 9, 2018

करिअर मार्गदर्शन...

करिअर मार्गदर्शन...

                         दि.09/06/2018 रोजी विद्यालयामध्ये भारती विद्यापीठ कोल्हापूर येथील इलेक्ट्रोनिक्स  डिपार्टमेंटचे प्रमुख असित कित्तूर सर यांचे व्याख्यान आयोजित केले होते. नुकताच दहावीचा निकाल ऑनलाईन घोषित झाला. विद्यालयातील सर्वच विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन विद्यालयाची सलग १००% निकालाची परंपरा नवव्यांदा कायम राखली. 
                या विद्यार्थांना पुढील करिअरच्या विविध वाटांची ओळख व्हावी या उद्देशाने हे व्याख्यान आयोजित केले होते. कित्तूर सरांनी आपल्या लाघवी भाषेत विद्यार्थ्यांना भविष्यातील  विविध टप्प्यांचे मार्गदर्शन केले. विविध बोधकथांच्या माध्यमातून आपण जीवन कसं जगलं पाहिजे याचा मूलमंत्र दिला. आत्मविश्वास बाळगून कठोर परिश्रम केल्यास यश नक्की मिळते असा विश्वास त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
       कार्यक्रमास विद्यालयाचे  मुख्याध्यापक श्री.एस.बी.कानडे, सहा.शिक्षक श्री.व्ही.एम.पात्रे, श्री.व्ही.के.पोतदार तसेच डॉ.तानाजी पाटील,अरविंद पोवार व इयत्ता दहावीचे विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.
कित्तूर सरांचे स्वागत करताना मुख्याध्यापक श्री.कानडे सर

Friday, June 1, 2018

गरजू विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वितरण

  एक हात मदतीचा...
                        
                  दि. 01.06.2018 रोजी विद्यालयामध्ये इयत्ता दहावीच्या गरजू विद्यार्थांना मोफत पाठ्यपुस्तके वितरीत करण्यात आली. गावातील दानशूर व्यक्ती व माजी विद्यार्थ्यांमार्फत हे वितरण करण्यात आले. यामध्ये श्री.पांडुरंग पोवार, प्रियांका काशीद, अरविंद पोवार, नवनाथ सुतार, गणेश पाटील, दीपक कांबळे यांनी विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तके प्रदान केली. 
                 इयत्ता दहावीच्या महेश बेरकळ, विजयकुमार पोवार, रोहन पोतदार, अवधूत चव्हाण, शैलेश कांबळे, सानिका कांबळे, पूजा सुतार, मयुरी दळवी, ऋतुजा नाईक, कोमल चव्हाण या दहा विद्यार्थांना ही पाठ्यपुस्तके वितरीत करण्यात आली.
               शासनामार्फत इयत्ता आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात. परंतु त्यापुढील शिक्षणासाठी पालकांना पाठ्यपुस्तके विकत घ्यावी लागतात. यासोबत वह्या व इतर शैक्षणिक साहित्य घेताना काही पालकांची दमछाक होते. ही गरज ओळखून शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन मदतीचा हात दिला व  अशा विद्यार्थी व  पालकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.  या त्यांच्या स्तुत्य उपक्रमाबद्दल विद्यालयातर्फे श्री.पांडुरंग पोवार, प्रियांका काशीद, अरविंद पोवार, नवनाथ सुतार,गणेश पाटील, दीपक कांबळे यांचे हार्दिक आभार...