Wednesday, May 1, 2024

शैक्षणिक वर्षात 100% उपस्थिती


🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆

देवी लक्ष्मी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित माध्यमिक विद्यालय चाफोडी , ता.करवीर,जि.कोल्हापूर या विद्यालयात शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये शैक्षणिक वर्षात एकही दिवस गैरहजर न राहिलेल्या इयत्ता आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांचा महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.  

सन्मानचिन्हप्राप्त सर्व विद्यार्थी व पालकांचे हार्दिक अभिनंदन

🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆

• संकल्पना:

श्री.विशाल पोतदार

• प्रोत्साहन

श्री.एस.बी.कानडे (मुख्याध्यापक)

🥈🥇🥈🥇🥈🥇🥈🥇

Saturday, April 27, 2024

मतदार जनजागृती

माध्यमिक विद्यालय चाफोडी ता करवीर येथील माध्यमिक विद्यालयात येत्या लोकसभेच्या धर्तीवर  2024 मध्ये मतदान करण्यात येणार आहे. त्यानिमित्त मतदारांच्या मध्ये जनजागृती व्हावी, लोकांनी आपले बहुमोल मत व्यर्थ न घालवता योग्य प्रतिनिधीची निवड करावी, मतदानाची टक्केवारी वाढावी, 100% मतदान व्हावे या उद्देशाने विद्यालयामार्फत 19 /4/ 2024 रोजी सकाळी  7:30 वाजता गावातून जनजागृती फेरीचे आयोजन करण्यात आले. या फेरीमध्ये विद्यालयातील मुख्याध्यापक श्री. एस. बी. कानडे सर, सर्व शिक्षक स्टाफ, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सहभागी झाले होते. मुलांनी हातामध्ये फलक घेऊन घोषणा देत चाफोडी, गर्जन आणि मांडरे या  तीन गावातून जोरजोरात घोषणा देत फेरी काढण्यात आली.विविध घोषणानी  व या फेरीने गावातील सर्व लोकांचे लक्ष वेधून घेतले . फेरीनंतर मुख्याध्यापक मा.श्री.एस बी कानडे सर यांनी सर्व मुलांना मतदानाबद्दल  मार्गदर्शन करताना घरी पालकांना जागृत करावं, पत्र लेखन,जनजागृती फेरी याच्या माध्यमातून निश्चित मतदानाची टक्केवारी वाढेल अशी अपेक्षा व्यक्त केली.  आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Saturday, April 20, 2024

समर कॅम्प

माध्यमिक विद्यालय चाफोडी ता. करवीर, जि. कोल्हापूर विद्यालयात उन्हाळी संस्कार शिबिर आयोजित करण्यात आले होते. कॅम्पचे उद्घाटन  मुख्याध्यापक मा. श्री. एस. बी. कानडे सर यांच्या हस्ते करण्यात आले. या संस्कार शिबिरामध्ये पारंपारिक, हरवत चाललेले खेळ यामध्ये लगोरी, विटी दांडू, सायकल चालवणे तसेच विविध फनी गेम्स यांचे आयोजन करण्यात आले होते. मुलांचे मनोरंजन व्हावे,मनोबल वाढावे, आपल्या संस्कृतीची ओळख व्हावी आणि ती आपण जतन करावी यासाठी तसेच मुलांचे शिक्षण आनंददायी व्हावे, उत्साहाने पुढील वाटचाल करावी या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मा मुख्याध्यापक श्री. एस. बी. कानडे सर यांनी या शिबिराबद्दल बहुमोल असे मार्गदर्शन केले.

Sunday, February 25, 2024

कोजिम प्रेरणा पुरस्कार


कोजिम प्रेरणा पुरस्कार

माध्यमिक विद्यालय चाफोडी, ता.करवीर, जि.कोल्हापूर विद्यालयातील मराठी विषयाचे तज्ञ अध्यापक श्री. व्ही.एम.पात्रे  सर यांना कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघ, कोल्हापूर यांच्या वतीने "कोजिम प्रेरणा पुरस्कार" प्रदान करण्यात आला. याबद्द्ल त्यांचे हार्दीक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा... शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे झालेल्या कार्यक्रमात, शिवाजी विद्यापीठ मराठी विभागप्रमुख डॉ. नंदकुमार मोरे, साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक किरण गुरव तसेच कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघ अध्यक्ष राजेंद्र पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. एस.बी.कानडे सर, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी व कुटुंबीय उपस्थीत होते...

Tuesday, February 13, 2024

गुरुवर्य डी.डी.आसगावकर गौरव पुरस्कार

 

''गुरुवर्य डी.डी.आसगावकर ट्रस्ट'' यांच्या वतीने देण्यात येणार "गुरुवर्य डी.डी.आसगावकर गौरव पुरस्कार'' माध्यमिक विद्यालय, चाफोडी. ता.करवीर विद्यालयाचे गणित विषयाचे तंत्रस्नेही अध्यापक श्री.व्ही.के.पोतदार सर यांना मंगळवार दि. 13/02/2024 रोजी दुपारी 3.00 वाजता केशवराव भोसले नाट्यगृह, खासबाग मैदान, कोल्हापूर या ठिकाणी खासदार मा.श्री.संजय मंडलिक साहेब यांच्या हस्ते पुणे विभागाचे शिक्षक आम.मा.जयंत आसगावकर साहेब, आम.मा.श्री.ऋतुराज पाटील, मा.आम.श्री.जयश्रीताई जाधव, आयुक्त मा.श्री.सुरज मांढरे साहेब यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. या सोहळ्यास इतर मान्यवर तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.श्री.एस.बी.कानडे सर व सहकारी आणि पोतदार कुटुंबिय उपस्थित होते.