Thursday, October 6, 2022

विद्यार्थ्यांनी केले श्रमदान...

                  माध्यमिक विद्यालय चाफोडी  ता.करवीर, जि. कोल्हापूर. येथे दि.2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती निमित्त स्वच्छता व श्रमदान कार्यक्रम राबविण्यात आला. यामध्ये मांडरे गावाशेजारील ओढ्यावरील पुलावरचे खड्डे मुजवण्याचे काम करण्यात आले .या पुलावरून जाताना प्रवाशांना खूपच कसरत करावी लागत होती. या श्रमदानामध्ये स्वतः मुख्याध्यापक, सर्व शिक्षक ,कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थिनीं सहभाग नोंदवला होता. मुलांचे हे श्रमदानाचे कार्य पाहून मांडरे गावचे आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त श्री.एम.जी.पाटील सर तसेच म्हालसवडे शाळेच्या अध्यापिका सौ.मनीषा पाटील मॅडम यांनी मुलांना खाऊचे वाटप केले.श्री.कुबेर पाटील यांनी श्रमदानासाठी सहकार्य केले.  श्रमदानानंतर मुख्याध्यापक श्री.एस.बी.कानडे सर यांनी श्रमदानाचे महत्त्व या विषयी सर्वांना मार्गदर्शन करून कार्यक्रमाची सांगता कऱण्यात आली.

Wednesday, October 5, 2022

 महात्मा गांधी जयंती निमित्त

रांगोळी स्पर्धा

             महात्मा गांधी जयंती निमित्त विद्यालयामध्ये रांगोळी स्पर्धेचे' आयोजन करण्यात आले. गेल्या अनेक वर्षांची परंपरा असलेली स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, महात्मा गांधी, स्वच्छ भारत-सुंदर भारत या विषयांवर विद्यार्थ्यांनी सुरेख रांगोळ्या रेखाटल्या. स्पर्धेचे परीक्षण माध्यमिक विद्यालय सडोली-सावर्डेचे कलाध्यापक श्री. शिवकुमार मुर्तूले सर यानी केले. स्पर्धेची सुरवात महात्मा गांधी यांच्या प्रतिमापुजनाने व दीपप्रज्वलन करुन करण्यात आली.   यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. एस.बी.कानडे सर, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थीत होते.

⧭ स्पर्धेचा निकाल ⧭

प्रथम: रोहिणी बाजीराव टिंगे

द्वितीय: श्वेता तानाजी पाटील

तृतीय: संचिता सर्जेराव सुर्वे

उत्तेजनार्थ: वैष्णवी भगवान बेरकळ





Saturday, October 1, 2022

सत्कार समारंभ

 

               माध्यमिक विद्यालय चाफोडी ता.करवीर या विद्यालयात दि प्राथमिक शिक्षक सहकारी बँक लि. कोल्हापूर या बँकेच्या संचालक पदी निवड झाले बद्दल देवी लक्ष्मी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित माध्यमिक विद्यालय चाफोडी यांच्या संयुक्त विद्यमाने सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. कार्यक्रमासाठी श्री.राजीव परीट सर (जि.प.सोसायटी चेअरमन)       सौ. पद्मजा मेढे मॅडम (व्हा.चेअरमन), श्री.एस.व्ही. पाटील सर, श्री.सुरेश कोळी सर, सौ. वर्षा केनवडे व श्री.शरद केनवडे सर श्री.गौतम वर्धन सर.  श्री.आर.एस.झेंडे सर ,श्री.अनील वरुटे सर, श्री.व्ही.आर.पाटील(अध्यक्ष,दे.ल.शि.प्र.मंडळ), श्री.एस.पी.सुतार सर (सचिव, दे.ल.शि.प्र.मंडळ) श्री.एस.व्ही.मुदगल सर(खजानिस,दे.ल.शि.प्र.मंडळ)हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.एस.बी.कानडे सर (मुख्याध्यापक, माध्यमिक विद्यालय चाफोडी) यांनी केले. तसेच सूत्रसंचालन श्री.व्ही.एम.पात्रे सर यांनी केले. 



Wednesday, September 14, 2022

हिंदी दिन

 

            १४ सप्टेंबर २०२२ रोजी विद्यालयामध्ये " हिंदी दिन " उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक मा. एस. बी. कानडे यांनी हिंदी भाषेचे महत्व विषद करून सर्वांना हिंदी दिनाच्या शुभेच्छा दिल्या. हिंदी दिनानिमित विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी यात उत्साहाने सहभागी होत उत्कृष्ट निबंध लिहिले. 

स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थी खालीलप्रमाणे

प्रथम: कु.धनश्री महादेव चव्हाण

द्वितीय: आर्या दत्तात्रय सुर्वे

तृतीय: रोहिणी चव्हाण

उत्तेजनार्थ: आकांक्षा विश्वास सुर्वे 

⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭

Tuesday, September 13, 2022

NMMS 2021-22


🎖️ अभिनंदनीय यश 🎖️

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS Exam 2021-22) मध्ये विद्यालयातील 19 प्रविष्ट विद्यार्थ्यांपैकी 16 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यापैकी

1) स्वराज सर्जेराव पाटील

2) उत्कर्ष उत्तम खोंद्रे

या विद्यार्थ्यांची NMMS शिष्यवृत्तीसाठी निवड झाली याबद्दल हार्दिक अभिनंदन...

नववी ते बारावीपर्यंत वार्षिक 12000/- (एकूण 48000/-) असे  शिष्यवृत्तीचे स्वरुप आहे.

⭆ सारथी शिष्यवृत्तीसाठी निवड झालेले विद्यार्थी 

1) सुहानी बाजीराव टिंगे

2) प्राजक्ता महादेव सुर्वे

3) शुभम एकनाथ दळवी

4) पृथ्वीराज संतोष पाटील

5) पार्थ शिवाजी पाटील

6) हर्षवर्धन नामदेव टिंगे

7) सोहम कुबेर पाटील

8) विश्वजित प्रकाश भावके

9) प्रेम बबन कोपार्डे

10) रोहिणी चंद्रकांत चव्हाण

११) पायल एकनाथ देसाई

१२) गायत्री युवराज चव्हाण

१३) वैष्णवी धोंडीराम पाटील

१४) अर्पिता साताप्पा चव्हाण

या विद्यार्थ्यांची सारथी संस्थेमार्फत देण्यात येणार्या  शिष्यवृत्तीसाठी (नववी ते बारावी वार्षिक 9600 = 38400/- रु) निवड झाली...याबद्द्द्ल या विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन

विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना मिळणारी एकूण शिष्यवृत्ती =

NMMS= 96,000/-

सारथी = 5,37,600/-

एकूण शिष्यवृत्ती = 6,33,600/-

🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक श्री.एस. बी.कानडे, व्ही.एम.पात्रे, बी.एस.पोवार, व्ही.के.पोतदार, आर.एल.चौगले यांचे मार्गदर्शन तर सस्थेचे अध्यक्ष श्री.व्ही. आर. पाटील, उपाध्यक्ष श्री. आर. एस. झेंडे, सचिव श्री.एस.पी.सुतार, खजानिस एस. व्ही. मुदगल यांचे प्रोत्साहन मिळाले.

🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

Wednesday, September 7, 2022

Friday, July 15, 2022

वाढदिवसानिमित्त भेट...

नातीच्या वाढदिवसानिमित्त विद्यालयास झाडे व पुस्तके प्रदान करताना महादेव टिंगे...



 

शालेय मंत्रिमंडळ निवडणूक २०२२

                                     




Tuesday, June 28, 2022

वार्षिक आरोग्य तपासणी


 
दि. २९/०६/२०२२ रोजी विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. आरोग्य अधिकारी डॉ. श्रद्धा पाटील, डॉ. शरद तावडे यांनी विद्यार्थ्यांची तपासणी करून त्यांना आरोग्य विषयक मार्गदर्शन केले.  फार्मासिस्ट सौ.शीतल पाटील, पारिचारिका नीता निकम यांनी मदत केली. 

😷😷😷😷😷😷😷😷😷😷

Thursday, June 23, 2022

गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

 विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करताना मुख्याध्यापक मा. एस.बी. कानडे सर व शिक्षक वृंद...




योग दिन २०२२

जागतिक योग दिन २०२२



दहावी (SSC) निकाल मार्च २०२२

सलग तेराव्या वर्षी 100% निकालाची उज्वल परंपरा

          इयत्ता दहावीचा निकाल दि.17/06/2022 रोजी ऑनलाईन घोषित झाला. विद्यालयाचा सलग तेराव्या वर्षी 100% निकाल लागला आहे. याबद्दल परिसरातून शाळेवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दहावीच्या मार्च 2022 परीक्षेस 46 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. सर्वच विद्यार्थी चागल्या गुणांनी उत्तीर्ण झाले. यामध्ये 36 विद्यार्थ्यांना विशेष प्राविण्य, 10 विद्यार्थांना प्रथम श्रेणी मिळाली.

गुणानुक्रम:

1. प्रणोती मारुती पाटील ( 96.00%)

2. समिक्षा कुबेर पाटील (95.40%)

3. धनराज बाजीराव टिंगे (93.80%)

     नयन राजाराम पाटील (93.80%)

4. प्रणव दत्तात्रय पाटील (92.20%)

5. सानिका बाजीराव बेरकळ (91.40%)

          यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक श्री.एस.बी.कानडे,  वर्गशिक्षक श्री.आर.एल.चौगले, श्री. व्ही.एम.पात्रे, श्री. बी.एस.पोवार, श्री. व्ही.के.पोतदार आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मार्गदर्शन तसेच संस्थेचे अध्यक्ष श्री.व्ही.आर.पाटील, उपाध्यक्ष श्री.आर.एस.झेंडे, सचिव श्री.एस.पी.सुतार, खजानिस श्री.एस.व्ही.मुदगल व संचालक मंडळ यांचे प्रोत्साहन लाभले.

अबक
स्टाफचा सत्कार करताना करवीर पंचायत समितीचे मा.सभापती विजयसिंह भोसले सोबत संस्थेचे सचिव मा. एस.पी.सुतार सर


Tuesday, June 14, 2022

नवागत विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव

 

नवागत विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प व पुस्तके देऊन स्वागत करताना विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.श्री.एस. बी. कानडे सर व शिक्षक वृंद...