माध्यमिक विद्यालय चाफोडी ता.करवीर, जि. कोल्हापूर. येथे दि.2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती निमित्त स्वच्छता व श्रमदान कार्यक्रम राबविण्यात आला. यामध्ये मांडरे गावाशेजारील ओढ्यावरील पुलावरचे खड्डे मुजवण्याचे काम करण्यात आले .या पुलावरून जाताना प्रवाशांना खूपच कसरत करावी लागत होती. या श्रमदानामध्ये स्वतः मुख्याध्यापक, सर्व शिक्षक ,कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थिनीं सहभाग नोंदवला होता. मुलांचे हे श्रमदानाचे कार्य पाहून मांडरे गावचे आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त श्री.एम.जी.पाटील सर तसेच म्हालसवडे शाळेच्या अध्यापिका सौ.मनीषा पाटील मॅडम यांनी मुलांना खाऊचे वाटप केले.श्री.कुबेर पाटील यांनी श्रमदानासाठी सहकार्य केले. श्रमदानानंतर मुख्याध्यापक श्री.एस.बी.कानडे सर यांनी श्रमदानाचे महत्त्व या विषयी सर्वांना मार्गदर्शन करून कार्यक्रमाची सांगता कऱण्यात आली.
No comments:
Post a Comment