सलग तेराव्या वर्षी 100% निकालाची उज्वल परंपरा
इयत्ता दहावीचा निकाल दि.17/06/2022 रोजी ऑनलाईन घोषित झाला. विद्यालयाचा सलग तेराव्या वर्षी 100% निकाल लागला आहे. याबद्दल परिसरातून शाळेवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दहावीच्या मार्च 2022 परीक्षेस 46 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. सर्वच विद्यार्थी चागल्या गुणांनी उत्तीर्ण झाले. यामध्ये 36 विद्यार्थ्यांना विशेष प्राविण्य, 10 विद्यार्थांना प्रथम श्रेणी मिळाली.
गुणानुक्रम:
1. प्रणोती मारुती पाटील ( 96.00%)
2. समिक्षा कुबेर पाटील (95.40%)
3. धनराज बाजीराव टिंगे (93.80%)
नयन राजाराम पाटील (93.80%)
4. प्रणव दत्तात्रय पाटील (92.20%)
5. सानिका बाजीराव बेरकळ (91.40%)
यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक श्री.एस.बी.कानडे, वर्गशिक्षक श्री.आर.एल.चौगले, श्री. व्ही.एम.पात्रे, श्री. बी.एस.पोवार, श्री. व्ही.के.पोतदार आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मार्गदर्शन तसेच संस्थेचे अध्यक्ष श्री.व्ही.आर.पाटील, उपाध्यक्ष श्री.आर.एस.झेंडे, सचिव श्री.एस.पी.सुतार, खजानिस श्री.एस.व्ही.मुदगल व संचालक मंडळ यांचे प्रोत्साहन लाभले.
No comments:
Post a Comment