Saturday, February 20, 2021

वह्या वाटप कार्यक्रम

मनुभाई आणि सुशीलाबेन देसाई परिवार ट्रस्ट मुंबई, अनुराम फौंडेशन मांडरे, यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येकी अर्धा डझन फुल स्केल वह्या वाटप करण्यात आल्या. कराड शहर पोलीस अधीक्षक मा. बी.आर.पाटील साहेब यांच्या प्रयत्नातून परिसरातील सर्वच शाळांतील विद्यार्थ्यांना ववह्या वाटप करण्यात आल्या. यावेळी घेतलेल्या शिक्षण परिषदेसाठी करवीर गटशिक्षणाधिकारी यादव साहेब, DIECPD चे माने सर, केंद्रप्रमुख कांबळे सर यांची प्रमुख उपस्थिती होती.

मा. श्री. बी.आर.पाटील साहेब मनोगत व्यक्त करताना


मुख्या.एस.बी.कानडे सर यांची सदस्यपदी निवड

विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.श्री. एस बी कानडे सर यांची महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ या राज्यस्तरीय संस्थेच्या कौन्सिल सदस्य पदी निवड झाली याबद्दल सरांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा ...

यानिमित्त घेण्यात आलेल्या सत्कार समारंभातील काही क्षणचित्रे 

देवी लक्ष्मी शिक्षण प्रसारक मंडळ यांचे वतीने सत्कार करताना उपाध्यक्ष आर.एस.झेंडे सर, सोबत सचिव एस.पी.सुतार सर, खजाणीस एस.व्ही.मुदगल सर. 
विद्यालयामार्फत सत्कार करताना श्री.व्ही.एम.पात्रे सोबत शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी
खजाणीस श्री.एस.व्ही.मुदगल सर
इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनी
सामाजिक कार्यकर्ते श्री.विलास पाटील
माध्यमिक विद्यालय क.आरळेचे मुख्या.श्री,तानुगडे सर
माध्यमिक विद्यालय क.आरळेचे विज्ञान अध्यापक श्री.सुधीर आमनगी सर 

बी.एस.पोवार सर गुरुदेव पुरस्काराने सन्मानित

शुक्रवार दि.19/02/2021 रोजी शाहू स्मारक कोल्हापूर येथे विद्यालयातील इंग्रजी अध्यापक श्री. बी.एस.पोवार सर यांना सर्वोदय फाऊंडेशन गगनबावडा, जि.कोल्हापूर या संस्थेमार्फत जिल्हास्तरीय गुरुदेव पुरस्कार प्रदान करण्यात आला.  आमदार पी.एन.पाटील साहेब, शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले...

सत्कार समारंभ  

Sunday, February 14, 2021

गणित अध्यापक विशाल पोतदार पुरस्काराने सन्मानित

विद्यालयातील गणित अध्यापक श्री. विशाल पोतदार यांना स्व.डी.बी.पाटील विचारमंच कोल्हापूर यांचे वतीने "डी.बी.पाटील आदर्श शिक्षक पुरस्कार" प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण मंत्री मा. वर्षाताई गायकवाड यांच्या हस्ते पुरस्कार वितरण झाले. यावेळी कोल्हापूर जिल्हा पालकमंत्री मा. सतेज उर्फ बंटी पाटील, मा.हसन मुश्रीफ, शिक्षक आमदार मा. जयंत आसगावकर, आमदार चंद्रकांत जाधव, राजुबाबा आवळे, मालोजीराजे छत्रपती,  शिक्षणाधिकारी मा. किरण लोहार यांची प्रमुख उपस्थिती होती...

सत्कार समारंभ
सत्कार  करताना देवी लक्ष्मी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव श्री.एस.पी.सुतार सर सोबत उपाध्यक्ष आर.एस.झेंडे सर, खजाणीस एस.व्ही मुदगल सर, मुख्या.श्री.एस.बी. कानडे सर
श्री. एस.व्ही.मुदगल सर
मुख्याध्यापक श्री.एस.बी.कानडे सर सोबत शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी
श्री.सर्जेराव पाटील, सौ.संगीता पाटील
तंत्रस्नेही माध्यमिक शिक्षक समूह कोल्हापूर