Thursday, December 6, 2018

गोवर-रूबेला लसीकरण मोहीम 2018

           गोवर व रूबेला या आजाराचे वाढलेलं प्रमाण कमी व्हावं यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने गोवर-रूबेला लसीकरण मोहीम सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार 6 डिसेंबर 2018 रोजी आपल्या माध्यमिक विद्यालय चाफोडी या प्रशालेतील विद्यार्थ्यांसाठी गोवर-रूबेला लसीकरण करण्यात आले. यावेळी आरोग्य विभागाच्या आरोग्यसेविका जे.एस.कांबळेसरिता पाटीलसंगीता पाटील आदींनी लसीकरण मोहीमेसाठी परिश्रम घेतले. लसीकरण पूर्ण झालेनंतर सरपंच सौ.राणी विलास पाटील व मुख्याध्यापक श्री.एस.बी.कानडे सर यांचे हस्ते विद्यार्थ्यांना लसीकरण प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.
           संपूर्ण भारतात गोवर व रूबेला  या आजारामुळे बालमृत्यू दरात वाढ होते. महाराष्ट्र राज्यातही अनेक बालकं गोवर या आजाराने ग्रस्त आहेत. या आजारामुळे बालमृत्यु दराचं वाढलेलं प्रमाण कमी व्हावं यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने लहान बालकांसाठी गोवर व रूबेला लसीकरण मोहीम सुरु करण्याचा निर्णय घेतला.  जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसारभारतात गोवरमुळे बालमृत्यूदरात वाढ होते. याशिवाय रुबेला संसर्गाने जन्मजात आजार होतात. त्यामुळे वाढलेलं बालमृत्यू दराचं प्रमाण कमी करण्यासाठी आणि जन्मजात असणारी विकलंगता कमी करण्यासाठी ही लसीकरण मोहीम सुरु करण्यात येणार आहे. या मोहिमेच्या माध्यमातून नऊ महिने ते 15 वर्षांपर्यंतच्या गोवरने ग्रस्त असणाऱ्या बालकांना हे लसीकरण देण्यात येणार आहे. भारताकडून गेल्या काही वर्षांमध्ये गोवरवर कशा पद्धतीने मात करता येईल याबाबत अनेक प्रयत्न करण्यात आलेत. यामुळे गोवरमुळे होण्याऱ्या मृत्युंमध्ये घट झाली.
गोवर-रूबेला लसीकरण

प्रमाणपत्र वाटप
प्रमाणपत्र वाटप करताना सरपंच सौ.राणी विलास पाटील

No comments:

Post a Comment