Wednesday, October 10, 2018

महात्मा गांधी जयंती 2018


महात्मा गांधी जयंती निमित्त रांगोळी स्पर्धा 2018

प्रतिमापूजन करताना मुख्या.कानडे सर, सोबत सरपंच सौ.राणी विलास पाटील


              महात्मा गांधी जयंती निमित्त विद्यालयामध्ये रांगोळी स्पर्धा आयोजित केल्या होत्या. प्रथम म.गांधीच्या प्रतिमेचे पूजन करून स्पर्धांची सुरुवात करण्यात आली. स्पर्धेचे उद्घाटन चाफोडीच्या सरपंच सौ.राणी विलास पाटील यांनी केले. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.एस.बी.कानडे सर, श्री.विलास पाटील, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, आजी-माजी विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

                   स्पर्धेसाठी 1.म.गांधी, 2.निसर्गरम्य देखावा, 3.प्लास्टिक टाळा-पर्यावरण वाचवा, 4.लेक वाचवा. 5.वृक्षसंवर्धन असे विषय देण्यात आले होते. स्पर्धेमध्ये 40 विद्यार्थांनी सहभाग घेतेला. निकाल खालीलप्रमाणे

प्रथम: प्रणाली अशोक सुतार 
द्वितीय: सानिका संजय पाटील
तृतीय: अनिकेत विठ्ठल पात्रे.
उत्तेजनार्थ: राधा सीताराम खडतरे, रसिका रंगराव सुतार.


विद्यार्थ्यांनी रेखाटलेल्या सुरेख रांगोळ्या

               




No comments:

Post a Comment