Monday, February 17, 2025

इयत्ता दहावी सदिच्छा समारंभ

*सदिच्छा समारंभ उत्साह साजरा*
माध्यमिक विद्यालय चाफोडी विद्यालयात इ.१०वीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ  दि.18/2/2025 रोजी मोठ्या उत्साहात साजरा झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवी लक्ष्मी शिक्षण  संस्थेचे सचिव मा.एस.पी.सुतार सर हे उपस्थित होते, तसेच संस्थेचे अध्यक्ष मा.व्ही.आर.पाटील सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन करण्यात आले. विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.एस. बी.कानडे सर यांनी प्रास्ताविक पर मनोगत व्यक्त केले.
 विद्यालयाच्या परंपरेनुसार इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी विद्यालयासाठी उपयुक्त वस्तू घेण्यासाठी आर्थिक भेट दिली. त्यानंतर इ. ८वी ९ वीच्या विद्यार्थ्यांची मनोगते झाली. तसेच इ.१०वीच्या विद्यार्थ्यांनी आपणाला विद्यालयात आलेली अनुभव  मनोगतातून व्यक्त केले. प्रमुख पाहुणे मा.व्ही.आर.पाटील सर यांनी विद्यार्थ्यांना हसवत उपदेशाचे डोस दिले. अध्यक्षीय भाषणात मा.एस पी सुतार सर यांनी उपस्थितांना बहुमोल असे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इ९वीच्या अनुष्का पाटील व श्रावणी पाटील यांनी केले तसेच आभार स्नेहल सुर्वे यांनी केले.


Friday, February 7, 2025

वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ

 

*वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ 2024 -25*

🥇🥇🥇🥇🥇🥇

 *माध्यमिक विद्यालय चाफोडी या विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ 8/2/2025 रोजी पार पडला.*

 या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवी लक्ष्मी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.व्ही.आर.पाटील सर हे होते.तसेच उपाध्यक्ष मा.आर.एस.झेंडे सर, सचिव मा. श्री.एस.पी सुतार सर,खजानिस मा.एस.व्ही. मुदगल सर हे प्रमुख उपस्थित होते.  सरस्वतीचे पूजन व रोपास पाणी घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. मुख्याध्यापक मा.एस.बी.कानडे सर यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक यांनी केले. त्यानंतर दि प्राथमिक शिक्षक बँक लि. कोल्हापूर या बँकेच्या उपाध्यक्षपदी पुनश्च निवड झाल्याबद्दल संस्थेचे उपाध्यक्ष मा.आर.एस.झेंडे सर यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. तसेच डॉक्टर होमी भाभा बालवैज्ञानिक कॉम्पिटिशनमध्ये व  विज्ञान प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये जिल्हास्तरीय निवड झाल्याबद्दल यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.तसेच ट्रॉफी, प्रमाणपत्र देवून पारितोषिक वितरणाने यशस्वी विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.आभाराने कार्यक्रमाची सांगता  करण्यात आली.