Monday, December 30, 2024

विज्ञान सुयश



*देवी लक्ष्मी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित माध्यमिक विद्यालय चाफोडी* ता. करवीर जि.कोल्हापूर या विद्यालयातील *कु. अनुष्का संभाजी पाटील* हिची *वैज्ञानिक प्रात्यक्षिक परीक्षेसाठी निवड* झाली. *बृहन्मुंबई विज्ञान अध्यापक मंडळ, मुंबई*. यांचे मार्फत घेण्यात येणाऱ्या *डॉक्टर होमी  भाभा बालवैज्ञानिक कॉम्पिटिशन* 2024 या वर्षातील बालवैज्ञानिक परीक्षा *उषाराजे  हायस्कूल कोल्हापूर* येथे दिनांक 30 /12 /2014 रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी विद्यालयातील एकूण 19 विद्यार्थी बसले होते त्यापैकी:

 *1)कु. अनुष्का संभाजी पाटील* (गुण 46) 

 *2)कु.आदित्य संतोष पाटील* (गुण37)

*3) कु. स्नेहल साताप्पा सुर्वे*( गुण 35)

 हे  उत्तीर्ण झाले असून *कु. अनुष्का संभाजी पाटील* हिची *डॉक्टर होमी भाभा बालवैज्ञानिक कॉम्पिटिशन जिल्हास्तरीय प्रात्यक्षिक परीक्षेसाठी निवड* झाल्याबद्दल त्यांचे *हार्दिक हार्दिक अभिनंदन*.

 *1 डिसेंबर 2024 रोजी नागेश्वर हायस्कूल राशिवडे ता. राधानगरी या विद्यालयात घेण्यात आलेल्या विज्ञान प्रज्ञाशोध परीक्षेत माध्यमिक विद्यालय चाफोडी शाळेचे 40 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी :*

*1) अथर्व दत्तात्रय सुर्वे*    (70 गुण)

 *2)समर्थ सरदार सुर्वे* (70गुण)

*3)सिद्धी सुभाष सुर्वे* (68गुण)

 *या विद्यार्थ्यांनी सुयश संपादन केले असून या विद्यार्थ्यांची जिल्हा स्तरीय विज्ञान प्रज्ञा शोध परीक्षेसाठी निवड झाली आहे*.

 *या सर्वच विद्यार्थ्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन*

 सर्व विद्यार्थ्यांना विज्ञान *अध्यापक श्री. आर. एल. चौगले सर यांचे मार्गदर्शन* तसेच *मुख्याध्यापक मा. एस बी.कानडे सर यांचे प्रोत्साहन* आणि संस्थेचे *अध्यक्ष मा श्री व्ही.आर.पाटील सर, उपाध्यक्ष मा.आर. एस. झेंडे सर,सचिव मा.एस.पी. सुतार सर,खजाणीस मा.एस.व्ही.मुदगल सर  व सर्व संचालक* यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

🥇🔍🔍🌹🌹🥇✒️

Saturday, December 28, 2024

शैक्षणिक सहल 2025

 

. 🚌🚌🚌🚌🚌🚌
     *शैक्षणिक सहल*
  *✤┈┈••✦✦••┈┈✤*

देवी लक्ष्मी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित
*माध्यमिक विद्यालय चाफोडी, ता.करवीर* विद्यालयाची शैक्षणिक सहल 26 व 27/12/2024 रोजी दोन दिवस एक मुक्कामी आयोजित केली होती. 
     पहिल्या दिवशी नारायणपूर येथे बालाजी दर्शन करून कात्रज येथील राजीव गांधी प्राणीसंग्रहालयास भेट दिली. त्यानंतर देहू, प्रतीशिर्डी येथील दर्शन करून आळंदी येथे मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी लेण्याद्री व ओझर येथील गणपती दर्शन करून शिवनेरी किल्ला विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या जयघोषात लिलया पार केला. 
     सहलीमध्ये 80 विद्यार्थी-विद्यार्थिनी उत्साहाने सहभागी झाले होते. यासाठी मुख्याध्यापक श्री.एस.बी.कानडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक - शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले तर संस्था अध्यक्ष श्री.व्ही.आर.पाटील सर, उपाध्यक्ष श्री.आर.एस.झेंडे सर, सचिव श्री.एस.पी.सुतार सर, खजानिस श्री.एस.व्ही.मुदगल सर यांचे प्रोत्साहन मिळाले.

•┈•✿✦Ⓜ️ *V* ©️✦✿•┈•

Thursday, December 5, 2024

डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दीन

देवी लक्ष्मी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित माध्यमिक विद्यालय चाफोडी विद्यालयामध्ये विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. एस. बी. कानडे सर यांचे हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी शिक्षक - शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी - विद्यार्थिनी उपस्थित होते...