Sunday, February 25, 2024

कोजिम प्रेरणा पुरस्कार


कोजिम प्रेरणा पुरस्कार

माध्यमिक विद्यालय चाफोडी, ता.करवीर, जि.कोल्हापूर विद्यालयातील मराठी विषयाचे तज्ञ अध्यापक श्री. व्ही.एम.पात्रे  सर यांना कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघ, कोल्हापूर यांच्या वतीने "कोजिम प्रेरणा पुरस्कार" प्रदान करण्यात आला. याबद्द्ल त्यांचे हार्दीक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा... शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे झालेल्या कार्यक्रमात, शिवाजी विद्यापीठ मराठी विभागप्रमुख डॉ. नंदकुमार मोरे, साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक किरण गुरव तसेच कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघ अध्यक्ष राजेंद्र पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. एस.बी.कानडे सर, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी व कुटुंबीय उपस्थीत होते...

Tuesday, February 13, 2024

गुरुवर्य डी.डी.आसगावकर गौरव पुरस्कार

 

''गुरुवर्य डी.डी.आसगावकर ट्रस्ट'' यांच्या वतीने देण्यात येणार "गुरुवर्य डी.डी.आसगावकर गौरव पुरस्कार'' माध्यमिक विद्यालय, चाफोडी. ता.करवीर विद्यालयाचे गणित विषयाचे तंत्रस्नेही अध्यापक श्री.व्ही.के.पोतदार सर यांना मंगळवार दि. 13/02/2024 रोजी दुपारी 3.00 वाजता केशवराव भोसले नाट्यगृह, खासबाग मैदान, कोल्हापूर या ठिकाणी खासदार मा.श्री.संजय मंडलिक साहेब यांच्या हस्ते पुणे विभागाचे शिक्षक आम.मा.जयंत आसगावकर साहेब, आम.मा.श्री.ऋतुराज पाटील, मा.आम.श्री.जयश्रीताई जाधव, आयुक्त मा.श्री.सुरज मांढरे साहेब यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. या सोहळ्यास इतर मान्यवर तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.श्री.एस.बी.कानडे सर व सहकारी आणि पोतदार कुटुंबिय उपस्थित होते.

Monday, February 5, 2024

समाज गुणगौरव पुरस्कार

देवी लक्ष्मी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मा. श्री. एस. पी. सुतार सर यांना सामाजिक सेवाभावी संस्था आदर्श फाउंडेशन पेठ नाका ता. वाळवा, जि. कोल्हापूर यांचे मार्फत समाज गुणगौरव पुरस्कार पर्सन ऑफ द इयर 2024  मिळालेबद्दल अभिनंदन करताना विद्यालयाचे मुख्याध्यापक मा .श्री.एस. बी. कानडे सर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी...

•┈•✿✦Ⓜ️ V ©️✦✿•┈•