माध्यमिक विद्यालय चाफोडी ता.करवीर, जि. कोल्हापूर. येथे दि.2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती निमित्त स्वच्छता व श्रमदान कार्यक्रम राबविण्यात आला. यामध्ये मांडरे गावाशेजारील ओढ्यावरील पुलावरचे खड्डे मुजवण्याचे काम करण्यात आले .या पुलावरून जाताना प्रवाशांना खूपच कसरत करावी लागत होती. या श्रमदानामध्ये स्वतः मुख्याध्यापक, सर्व शिक्षक ,कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थिनीं सहभाग नोंदवला होता. मुलांचे हे श्रमदानाचे कार्य पाहून मांडरे गावचे आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त श्री.एम.जी.पाटील सर तसेच म्हालसवडे शाळेच्या अध्यापिका सौ.मनीषा पाटील मॅडम यांनी मुलांना खाऊचे वाटप केले.श्री.कुबेर पाटील यांनी श्रमदानासाठी सहकार्य केले. श्रमदानानंतर मुख्याध्यापक श्री.एस.बी.कानडे सर यांनी श्रमदानाचे महत्त्व या विषयी सर्वांना मार्गदर्शन करून कार्यक्रमाची सांगता कऱण्यात आली.
Thursday, October 6, 2022
Wednesday, October 5, 2022
महात्मा गांधी जयंती निमित्त
रांगोळी स्पर्धा
महात्मा गांधी जयंती निमित्त विद्यालयामध्ये रांगोळी स्पर्धेचे' आयोजन करण्यात आले. गेल्या अनेक वर्षांची परंपरा असलेली स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, महात्मा गांधी, स्वच्छ भारत-सुंदर भारत या विषयांवर विद्यार्थ्यांनी सुरेख रांगोळ्या रेखाटल्या. स्पर्धेचे परीक्षण माध्यमिक विद्यालय सडोली-सावर्डेचे कलाध्यापक श्री. शिवकुमार मुर्तूले सर यानी केले. स्पर्धेची सुरवात महात्मा गांधी यांच्या प्रतिमापुजनाने व दीपप्रज्वलन करुन करण्यात आली. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. एस.बी.कानडे सर, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थीत होते.
⧭ स्पर्धेचा निकाल ⧭
प्रथम: रोहिणी बाजीराव टिंगे
द्वितीय: श्वेता तानाजी पाटील
तृतीय: संचिता सर्जेराव सुर्वे
उत्तेजनार्थ: वैष्णवी भगवान बेरकळ
Saturday, October 1, 2022
सत्कार समारंभ
माध्यमिक विद्यालय चाफोडी ता.करवीर या विद्यालयात दि प्राथमिक शिक्षक सहकारी बँक लि. कोल्हापूर या बँकेच्या संचालक पदी निवड झाले बद्दल देवी लक्ष्मी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित माध्यमिक विद्यालय चाफोडी यांच्या संयुक्त विद्यमाने सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. कार्यक्रमासाठी श्री.राजीव परीट सर (जि.प.सोसायटी चेअरमन) सौ. पद्मजा मेढे मॅडम (व्हा.चेअरमन), श्री.एस.व्ही. पाटील सर, श्री.सुरेश कोळी सर, सौ. वर्षा केनवडे व श्री.शरद केनवडे सर श्री.गौतम वर्धन सर. श्री.आर.एस.झेंडे सर ,श्री.अनील वरुटे सर, श्री.व्ही.आर.पाटील(अध्यक्ष,दे.ल.शि.प्र.मंडळ), श्री.एस.पी.सुतार सर (सचिव, दे.ल.शि.प्र.मंडळ) श्री.एस.व्ही.मुदगल सर(खजानिस,दे.ल.शि.प्र.मंडळ)हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.एस.बी.कानडे सर (मुख्याध्यापक, माध्यमिक विद्यालय चाफोडी) यांनी केले. तसेच सूत्रसंचालन श्री.व्ही.एम.पात्रे सर यांनी केले.