Friday, September 19, 2025

पालक-शिक्षक सभा

*पालक-शिक्षक सभा उत्साहात संपन्न*
🎊🎊🎊🎊🎊🎊🎊
*माध्यमिक विद्यालय, चाफोडी ता.करवीर विद्यालयात शैक्षणिक वर्ष 2025-26 या वर्षातील पहिली पालक-शिक्षक सभा शनिवार दि.20/09/2025 रोजी मोठ्या उत्साहात पार पडली.*
*सभेच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.एस.बी.कानडे सर हे होते.*
*प्रथम मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.व्ही.एम.पात्रे सर यांनी केले.त्यानंतर सर्व वर्गशिक्षकांनी आपण घेत असलेल्या उलक्रमांची व अध्यापनाची सविस्तर माहिती पालकांना दिली*.
*त्यानंतर सभेपुढील विषय: शाळेची शिस्त, परीक्षा निकाल,सहशालेय उपक्रम आरोग्य, मोबाईल,टिव्ही यांचा वापर इत्यादी विषयांवर सखोल चर्चा झाली,चर्चेमध्ये जास्तीत जास्त पालकांनी आपली मते मांडली.*
*अध्यक्षीय भाषणात मा.एस.बी.कानडे सर यांनी 'विद्यार्थ्यांच्या अभ्यासामध्ये पालकांची भूमिका किती महत्वाची'या विषयावर सर्व उपस्थिताना बहुमोल असे मार्गदर्शन केले*.
*शेवटी आभाराने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.*
🔹🌹🔹🌹🔹🌹🔹