Monday, October 16, 2023

वार्षिक तपासणी २०२३/२४

 

चाफोडी दि. 17                    
येथील माध्यमिक विद्यालय चाफोडी ता. करवीर या विद्यालयाची वार्षिक तपासणी दि. 17 /10/ 2023 रोजी करण्यात आली. जिल्हा परिषद कोल्हापूर माध्यमिक विभागाचे अभ्यासू शिक्षण विस्तार अधिकारी मा. डी.ए.पाटील साहेब यांच्या पथकाने तपासणी केली. या पथकामध्ये मुख्याध्यापक मा. टी. डी.पाटील सर,  मुख्याध्यापक मा. टी.एम.परीट सर,  मुख्याध्यापक मा. बी.डी.साळवी सर, महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त श्री. एस.ए.आमणगी सर, श्री जी.डी. सावंत सर, श्री.ए.पी.पाटील सर या  टीमने सकाळी 10 वाजता शाळेत उपस्थित राहून परिपाठापासून सर्व घटकांची तपासणी केली. मा डी. ए.पाटील साहेब यांनी सर्व शालेय कामकाज दप्तर तपासणी केली. इतर सर्व पथकाने वर्गातील अध्यापनाची तपासणी केली. तसेच सर्व नोंदवह्या, स्वाध्याय, गृहपाठ, प्रकल्प इ. तपासणी केली शेवटी सभा घेण्यात आली. या सभेमध्ये सर्व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. मा.डी.ए.पाटील साहेब यांनी उल्लेखनीय बाबींचा उल्लेख करून काही सूचना दिल्या. त्यानंतर मुख्याध्यापक मा.एस.बी. कानडे सर यांनी कामकाजाबद्दल मनोगत व्यक्त करून  उपस्थितांचे आभार मानले.