Thursday, October 10, 2019

महात्मा गांधी जयंती २०१९


             माध्यमिक विद्यालय चाफोडी, ता.करवीर, जि. कोल्हापूर या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मानवी साखळीतून 'महात्मा' शब्द तयार करुन  गांधी जयंतीनिमीत्त अशाप्रकारे महात्मा गांधींना अभिवादन केले.
            याप्रसंगी विद्यार्थ्याना शाळेचे मुख्याध्यापक श्री.एस.बी.कानडे, व्ही.एम.पात्रे, बी.एस.पोवार, व्ही.के.पोतदार, आर.एल.चौगले यांचे मार्गदर्शन, छायाचित्रकार राम पाटील यांचे सहकार्य लाभले, तसेच संस्थेचे अध्यक्ष श्री.व्ही आर पाटील, उपाध्यक्ष आर.एस.झेंडे, सचिव एस.पी.सुतार व खजानिस एस.व्ही.मुदगल यांचे प्रोत्साहन मिळाले...


* वर्तमानपत्रांनी घेतली दखल *
दै. तरुण भारत
दै. पुढारी
दै. सकाळ
दै.पुण्यनगरी
दै. कीर्तिवंत


महात्मा गांधी जयंती निमित्त रांगोळी स्पर्धा
महात्मा गांधी प्रतिमापूजन प्रसंगी संस्थेचे सचिव श्री.एस.पी.सुतार, सरपंच सौ.राणी विलास पाटील, मुख्याध्यापक श्री .एस.बी.कानडे, श्री.विलास पाटील व शिक्षक वृंद...
छायाचित्रकार राम पाटील यांचा सत्कार...



विद्यार्थ्यांनी रेखाटलेल्या रांगोळ्या

Thursday, September 5, 2019

शिक्षक दिन २०१९


शिक्षक दिनानानिमित्त विद्यार्थ्यांना स्नेहभोजन




Thursday, August 1, 2019

लोकमान्य टिळक पुण्यतिथी


 लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त चित्रकला स्पर्धा

Saturday, June 22, 2019

SSC Result March 2019


अभिनंदनीय यश...
एस.एस.सी.निकाल मार्च २०१९ : १००%
१००% निकालाची दशकपूर्ती

          इयत्ता दहावीचा निकाल दि.08/06/2019 रोजी ऑनलाईन घोषित झाला. याही वर्षी विद्यालयाचा 100% निकाल लागला असून सलग दहा वर्षे 100% निकालाची परंपरा कायम राखली आहे. याबद्दल परिसरातून शाळेवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
          दहावीच्या मार्च 2019 परीक्षेस 53 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. सर्वच विद्यार्थी चागल्या गुणांनी उत्तीर्ण झाले. यामध्ये 20 विद्यार्थ्यांना विशेष प्राविण्य, 29 विद्यार्थांना प्रथम श्रेणी व  4 विद्यार्थ्यांना द्वितीय श्रेणी मिळाली.

गुणानुक्रम:

1. सानिका संजय पाटील ( 90.20%)

2. सानिका बापू  सुतार  (87.80%)

3. अनिकेत विठ्ठल पात्रे (87.60%)

4. अमृता विलास चव्हाण ( 87%)

5. सुनिल राजाराम चव्हाण ( 86.80%)
    रसिका रंगराव सुतार  ( 86.80%)


   यशस्वी विद्यार्थ्यांना देवी लक्ष्मी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री.व्ही.आर.पाटील, उपाध्यक्ष श्री.आर.एस.झेंडे, सचिव श्री.एस.पी.सुतार, खजानिस श्री.एस.व्ही.मुदगल यांचे प्रोत्साहन तर मुख्याध्यापक श्री.एस.बी.कानडे,  वर्गशिक्षक श्री.व्ही.एम्.पात्रेश्री.बी.एस.पोवार, श्री.व्ही.के.पोतदार , श्री.आर.एल.चौगले आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले.


दैनिकांनी घेतलेली दखल
दै.तरुण भारत

दै.पुढारी

 गरीब परिस्थितीत सानिकाने मिळवले उज्वल यश...